सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज

 

■ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्याशी संवाद साधताना महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा सोबत अतिरिक्त आयुक्त(२) संजय हेरवाडे.


ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या माजीवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना आज ज्युपिटर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. सायंकाळी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी हॉस्पिटलमध्ये त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान लवकरच कामावर रुजू होवून पुन्हा धडक कारवाई सुरू करणार असल्याचे सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी सांगितले.            शहरात फेरीवाल्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या कल्पिता पिंपळे यांच्यावर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांना आज घरी सोडण्यात आले. सायंकाळी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांची भेट घेवून प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनीं डॉक्टरांशी संवाद साधत पुढील उपचाराची माहिती घेतली.     दरम्यान उपचारानंतर लवकरच कामावर रुजू होणार असून पुन्हा धडक करवाईची मोहीम हाती घेणार असल्याचे सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments