डेनिस डिसोझा यांच्या स्मृतिदिना निमित्त मोफत लसीकरण

 ठाणे (प्रतिनिधी)  - सेंट लॉरेन्स एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डेनिस डिसोझा यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या उपस्थितीमध्ये या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.           सेंट लॉरेन्स एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टने फोर्टीस ग्रुप ऑफ हॉस्पीटल यांच्या समन्वयाने या शिबिराचे आयोजन सिल्वेस्टर डिसोझा यांनी आयोजित केले होते. या शिबिरामध्ये डिसोझावाडी, रतनबाई कंपाउंड, शिवाजी नगर आदी  येथील शेकडो नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. या शिबिरासाठी सेंट लॉरेन्स हायस्कूलमध्ये संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा तैनात करण्यात आली होती.           यावेळी विरोधी पक्षनेते शानू पठाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण, नगरसेवक दीपक वेतकर, राम रेपाळे, मा. नगरसेवक प्रविण भानुशाली, मनोज शिंदे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे शहराध्यक्षा सुजाता घाग, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस रवींद्र पालव,   सामाजिक न्याय खात्याचे ठाणे शहराध्यक्ष कैलास हावळे , संदीप जाधव, विशाल कामकर, मंगेश वाळुंज, अभिजीत पांचाळ आदींनी डेनिस डिसोझा यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments