श्रीगणेश विसर्जन व्यवस्थेची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी यंदा विसर्जनासाठी दिलेल्या शिस्तबद्ध प्रतिसादा बद्दल आयुक्तांनी मानले भाविकांचे आभार

 ठाणे , प्रतिनिधी  : सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त गणेशमुर्तीं विसर्जनासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या श्रीगणेश विसर्जन व्यवस्थेची आज महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी प्रत्यक्षस्थळी जावून पाहणी केली. यावेळी ठाणेकरांनी यंदा कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करत महापालिकेच्या विसर्जन व्यवस्थेला अत्यंत शिस्तबद्ध प्रतिसाद दिल्याबद्दल महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व भाविकांचे आभार मानले.      आज श्री गणेश विसर्जनाच्या पाचव्या दिवशी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी कोलशेत विसर्जन महाघाट येथून विसर्जन व्यवस्थेची पाहणी करण्यास सुरुवात केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, उप आयुक्त मारुती खोडके, नगर अभियंता अर्जुन अहिरे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.        दरवर्षीप्रमाणे श्री गणेश मुर्तींचे विधिवत विसर्जन व्हावे यासाठी महापालिकेच्यावतीने एकूण ७ विसर्जन महाघाट, १३ कृत्रीम तलाव तर ज्या भाविकांना विसर्जन घाट किंवा कृत्रीम तलावांच्या ठिकाणी श्री मुर्तींचे विसर्जन करता येणे शक्य नाही त्यांच्यासाठी २० ठिकाणी श्री गणेश मुर्ती स्वीकार केंद्रे उभारण्यात आली आहेत.            

          त्यासोबतच कोरोना पार्श्वभूमीवर गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यासाठी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी यावर्षीही ९ प्रभाग समितीतंर्गत फिरती विसर्जन व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. तसेच गणेशमूर्ती विसर्जनासाठी डिजीठाणे प्रणाली मार्फत ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली असून याला देखील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.


    

           आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी कोलशेत विसर्जन महाघाट, कोपरी, उपवन तलाव, रायलादेवी व मासुंदा तलाव येथील विसर्जन व्यवस्थेची पाहणी करून संपूर्ण यंत्रणेचा आढावा घेतला. 


       

             यंदा कोरोनाचा पार्श्वभूमीवर भाविकांनी कोव्हिड-१९ नियमावलीचे काटेकोरपणे पालन करत महापालिकेच्या विसर्जन व्यवस्थेला अत्यंत शिस्तबद्ध प्रतिसाद दिल्याबद्दल महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व भाविकांचे आभार मानले.             दरम्यान कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रत्येक विसर्जनस्थळी उभारण्यात आलेल्या अँन्टीजन चाचणी केंद्राची देखील महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी करून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल भाविकांचे आभार मानले.

    

Post a Comment

0 Comments