रस्त्यातील खड्डे न बुजविल्यास खड्ड्यां मध्ये झाडे लावण्याचा भाजपाचा इशारा


■भाजपा मोहने टिटवाळा मंडळ सचिव सुशील कुमार पायाळ यांचे आयुक्तांना निवेदन....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अ प्रभागातील रस्त्याची दुरवस्था  झाली असून येत्या दोनदिवसात रस्त्यांमधील खड्डे योग्य प्रकारे गुणवत्ता पूरक न भरल्यास खड्ड्यांमध्ये झाडे लावून आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत भाजपा मोहने टिटवाळा मंडळ सचिव सुशीलकुमार पायाळ यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे.


"अ" प्रभागातील रस्त्यांची अक्षरशा चाळण झालेली असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातात नागरिकांना किरकोळ जखमा झाल्या असून नागरिकांचा प्राण जाण्याची शक्येता नाकारता येत नाही. असे असताना सुद्धा खड्डे बुजवण्याच्या कामात कामचुकारपणा करून या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. खड्डे बुजवण्याच्या नावाखाली फक्त खड्यांमध्ये माती आणि खडीचे मिश्रण टाकत आहेत. डांबर आणि खडीचे मिश्रण ज्या वेळेस खड्डे बुजवण्यासाठी वापरतो त्याची गुणवत्ता ठरवलेल्या गुणवत्तेच्या कोणत्याच निकषाशी जुळत नाही आणि १० ते १५ दिवसात पुन्हा तीच परिस्थीथि निर्माण होते.अशा सर्व दुर्लशीत प्रश्नामुळे नागरिकांना प्रश पडला आहे की नेमके  प्रभाग हा केडीएमसीच्या हद्दीत आहे की बाहेर आहेकारण नागरिकांकडून महापालिका प्रशासन जर कर वसूल करत असेल तर मग आवश्यक सुविधा का पुरवत नाही असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे अशा मुजोर ठेकेदारांची सर्व देयके थांबवून तात्काळ त्याला नागरिकाच्या समस्या सोडवण्याची ताकीद द्यावी अन्यथा पुढील आठवड्यांमध्ये नागरिकांच्या प्रश्नांसाठी नागरिक व वाहन चालाकांसोबत त्याच रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये झाडे लावून आंदोलन करण्याचा इशारा भाजपा मोहने टिटवाळा मंडळ सचिव सुशीलकुमार पायाळ यांनी आयुक्तांना दिला आहे.

Post a Comment

0 Comments