शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या दीपक काळे यांच्यावर संघटक सचिव पदाची जवाबदारी
कल्याण , कुणाल  म्हात्रे   : काही दिवसांपूर्वीच शिवसेनेतून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये  प्रवेश केलेल्या शिवसेनेच्या माजी विभाग प्रमुख दीपक काळे यांना राष्ट्रवादी संघटक सचिव पदाची जवाबदारी देण्यात आली आहे.राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस तथा महाराष्ट्र प्रदेश कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण मधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यामध्ये शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख दीपक काळे व त्यांचे पंचवीस सहकारी पदाधिकारी यांचा समावेश होता. यातील दीपक काळे यांच्यावर राष्ट्रवादीच्या संघटक सचिव पदाची जवाबदारी सोपविण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र कल्याण पश्चिमचे विधानसभा अध्यक्ष संदीप देसाई यांच्याहस्ते देण्यात आले.यावेळी कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष संदीप देसाई, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस तथा महाराष्ट्र प्रदेश कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कल्याण शहर अध्यक्ष निखिल कदम, ब प्रभाग अध्यक्ष भगवान साठे, माजी नगरसेवक उमेश बोरगावकर, सोमनाथ सातारकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.    


Post a Comment

0 Comments