शॉर्ट सर्किट मुळे बँक ऑफ बडोदाला आग

 कल्याण, कुणाल  म्हात्रे  : मोहने येथील बँक ऑफ बडोदा मध्ये सकाळच्या सुमारास शॉर्टसशॉर्टर्किटने वायरिंग जळाल्याने धुरांचे लोट बाहेर पडू लागले. बँकेचे शिपाई सुकुमार माने यांनी बँक उघडताच हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.पूर्वी विजया बँक म्हणून ओळखली जाणारी बँक ऑफ बडोदा मध्ये रुपांतरीत झाली आहे. सकाळी नऊच्या दरम्यान बँकेच्या शिपायाने बँक उघडली असता शॉर्ट सर्किटमुळे वायर मधून धुर येत असल्याचे त्यांना समजले. स्टोअर रूम मधून शॉर्टसर्किटला सुरुवात झाल्याने बँकेतील सर्व वायर यामध्ये जळून खाक झाल्या. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल होवुन परिस्थिती आटोक्यात आणली. या शॉर्टसर्किटमुळे बँकेतील जुने रेकॉर्ड आगीला कारणीभूत ठरल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.बँकेतील संगणक व इतर इलेक्ट्रिकल वस्तू मात्र शाबूत राहिल्या आहेत. खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बँकेचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच शॉर्टसर्किट झाल्याने जीवित हानी झाली नसून बँक व्यवस्थापकांनी याबाबत खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments