कोकाण वासियांसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिदेंकडून २०० मोफत बससेवा चाकरमान्यां मध्ये आनंदाचे वातावरण


 डोंबिवली शंकर जाधव ) करोना काळात चाकरमान्यांना कोकणात गणेशोत्सव साजरा करता आला नाही.करोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्यावर यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यासाठी शिवसेनेने २०० मोफत बससेवा दिली. यापैकी डोंबिवलीतून एकशे तीस शिवशाही व एसटी बसेस मधून पाच हजाराहुन अधिक चाकरमानी गावाला गेले. कोरोनाच्या पादुर्भावामुळे गेल्या वर्षी  कोरोनाच्या संक्रमणामुळे कोकणात गणोशोत्सवासाठी  गावाला जाता आले नाही. 
         त्यामुळे त्यावर्षी कोकणवासी नाराज झाले होते.मात्र यावर्षी जायला मिळाला या आनंदात खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या वतीने डोंबिवलीतील हजारो डोंबिवलीकर बांधवांसाठी सुमारे १३० हुन अधिक मोफत शिवशाही व एसटी  बसेसला  खा. शिंदे यांनी झेंडा दाखवून बस गाड्या कोकणाकडे रवाना झाल्या.

 
        डोंबिवली पश्चिमेकडील मोठागांव चौक येथील  माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांच्या कार्यालया नजीकच्या परिसरातून पश्चिम विभागातील उमेश नगरगोपीनाथ चौक, देवीचा पाडासखाराम कॉमलेक्सजुनी डोंबिवलीगरिबाचा वाडा आदी परिसरात राहणाऱ्या हजारो कोकणी बांधवासाठी  महाड,चिपळूण रत्नागिरी पासून थेट तळ कोकण असलेल्या वेंगुला सावंतवाडीपर्यत कोकणात गणेशोत्सवासाठी २५ हुन अधिक शिवशाही व एसटी बसेस मोफत सोडण्यात आल्या या बेसस मधून हजारो कोकणी बांधव गावी आनंदाने निघाले होते.

         तर गोपीनाथ चौक डोंबिवली पश्चिम येथून माजी जेष्ठ नगरसेवक वामन म्हात्रेमाजी नगरसेविका कविता म्हात्रे आणि शिवसैनिक समाजसेवक बाळा म्हात्रे यांच्या नियोजनाने १० बसेस कोकणात सोडण्यात आल्या.यावेळी अनमोल म्हात्रे. संदीप सामंत, एड.गणेश पाटील,युवा सेना पदाधिकारी राहुल म्हात्रे, कैलास सणस, भाई पानवडीकर आदि उपस्थित होते. 

                खेडदापोलीमंडणगडचिपळूणरत्नागिरीलांजाराजापूरकणकवलीसावंतवाडी आदी ठिकाणी जाण्यासाठी कोकणवासीयांनी जागा पकडून ठेवल्या होत्या. त्यांना प्रवासात कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होऊ नये म्हणून विभागप्रमुख संदीप सामंतउपविभागप्रमुख अवि मानकरशाखा प्रमुख मोहन वैद्य यांनी विशेष मेहनत घेतली. प्रवाश्यांना पाण्याची व्यवस्थाखाण्याची व्यवस्था आणि प्रथमोपचार औषधे आदी चोख तजवीज करण्यात आली होती. 

शहरातील पूर्व-पश्चिम विभागातील कोपरगावकोपररोडसखारामनगरजुनी डोंबिवलीठाकूरवाडीदेवीचापाडा महाराष्ट्रनगरराजूनगरनवापाडा त्याचप्रमाणे ९० फीट रोडगांधीनगरग्रामीण विभाग आदी मिळून सुमारे १३० बस कोकणात रवाना झाल्या.

सदर मोफत बसेस सोडण्याच्या कार्यक्रमाला खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी झेंडा दाखवुन सर्व बसे कोकणात रवाना झाल्या यावेळी माजी महापौर वनिता राणेडोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरेमाजी नगरसेवक विश्वनाथ राणेदीपेश म्हात्रे  यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments