चालकदिना निमित्त वाहन चालकांना वाहतुक नियामांचे धडे

                                                 कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  १७ सप्टेंबर वाहन चालक दिनाचे औचित्य साधत कल्याण पश्चिमेतील रेतीबंदर गणेशघाट नाक्यावर उप प्रादेशिकपरिवहन कार्यालय कल्याण विभागसेवाभावी संस्थाच्या माध्यमातून वाहतुक नियमांचे धडेवाहतूक नियमांचे पालन या संदर्भात जनजागृती करीत रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांचा सत्कार करून वाहन चालकांना सुखद धक्का दिला.


                                                

उपप्रादेशिक परिवहन कार्यलय कल्याण तसेच हरियालीफाँऊडेशन् आयव्हीए फाँऊडेशन, एपी फाँऊडेशन्हेर आँटो कल्याण यांच्या माध्यमातून चालकदिनाच्या पुर्वसंध्येला कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, गणेश घाट परिसरात रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांचा गुलाबपुष्पॅनीटायझरमास्क देत सत्कार करीत वाहतूक नियमांचे पालन करण्यांचे, सुरक्षितपणे वाहन चालविण्याबाबत धडे देण्यात आले.  तानाजी चव्हाण उपप्रादेशिक परिवहन आधिकारी कल्याण यांनी एसटी. चालकांचा सत्कार करीत ते करीत असलेल्या प्रवाशी सेवेबद्दल त्यांचे कौतुक केले. त्यांच्या कौतुकामुळे एस् टी चालक भारावून गेल्याचे चित्र यानिमित्ताने दिसले. आहेर आँटो यांच्यावतीने दुचाकी चालकांना हेलमेटचे मोफत वाटप करण्यात आले. उपप्रादेशिक कार्यालय कल्याण यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्तुत्य उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. याप्रसंगी तानाजी चव्हाण उपप्रादेशिक आधिकारी कल्याणमोटार वाहन निरिक्षक दिपक शिंदेसुनील बजाजविकास महालेशेखर जोशीविशाल शेटेअश्विन पेशवानीदेवराम बांडेराजुभाई आदी मान्यवर उपस्थित होते. उपप्रादेशिक  परिवहन आधिकारी तानाजी चव्हाण यांनी वाहन चालकांनी रस्ता सुरक्षितता नियमांचे पालन करीत वाहन चालविली पाहिजेत वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे असे आवाहन केले. 

Post a Comment

0 Comments