भाजपा महिला मोर्चाच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा गौरव

 कल्याण, कुणाल म्हात्रे  : भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा रेखा राजन चौधरी आणि हेल्पिंग हॅण्ड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कोरोन योद्ध्यांचा गौरव करण्यात आला.


 

कोरोनाच्या सुरवातीच्या काळापासूनच अनेक आशा वर्कर आणि आरोग्य कर्मचारी हे नागरिकांची सेवा करत आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन देखील काम केले आहे. अशा या कोरोना योद्ध्यांचा सन्मान भाजपा महिला जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी यांच्यावतीने करण्यात आला. तिसगाव आरोग्य केंद्र याठिकाणी डॉक्टर, नर्स, आशा वर्कर आदी आरोग्य सेवकांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करीत गौरविण्यात आले. तसेच त्यांना पिपिई कीट आणि हायजेनिक कीट देखील भेट म्हणून देण्यात आले. यावेळी डॉ. भानुशाली, डॉ. दीक्षा, स्मृती गायकवाड आदीजण उपस्थित होते.  


Post a Comment

0 Comments