घर काम करणाऱ्या महिलेची दगडाने ठेचून हत्या पोलिसांचा पतीवर संशय ; तपासांची दोन पथके रवाना
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याणच्या गांधारी परिसरात एका घर काम करणाऱ्या  महिलेचा दगडाने ठेचून हत्या केलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. हत्येचा संशय महिलेच्या पतीवर व्यक्त केला जात असून खडकपाडा पोलिस  तपास करीत आहेत. कल्याण पश्चीमेतील गांधारी परिसरात रिंग रोडचे काम सुरु आहे. आज सकाळी १०  वाजण्याच्या सुमारास या रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह नागरिकांना आढळून आला. याची माहिती कल्याणच्या खडकपाडा पोलिसांना देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मयत महिलेचे नाव लक्ष्मी मोहिते (32) ही त्याच परिसरात घर काम करणारी आहे. लक्ष्मी ही भिवंडीतील सावद गाव परिसरात राहत होती. लक्ष्मीची हत्या तिचा पती जर्नादन मोहिते याने केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. सध्या तो बेपत्ता आहे. लक्ष्मीची हत्या दगडाने ठेचून करण्यात आली आहे. या महिलेच्या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीसांची दोन पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आले असल्याचे खडकपाडा पोलीस स्टेशनचे व.पो.नि. अशोक पवार यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments