विसर्जनाच्या पाचव्या दिवशीही २५५२ नागरिकांची अँटीजन चाचणी

 

■सातव्या व दहाव्या दिवशीही भाविकांनी सहकार्य करण्याचे महापौर व आयुक्तांचे आवाहन..


ठाणे , प्रतिनिधी  :  शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांची अँन्टीजन चाचणी करण्याची ठाणे महापालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या व्यवस्थेंतर्गत २४ ठिकाणी काल पाच दिवसाच्या गौरी-गणपती विसर्जन करण्यासाठी आलेल्या २,५५२ भाविकांची अँटीजन चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये फक्त एकाच व्यक्तीची चाचणी पॉझिटिव्ह आली असून यापुढे सातव्या व दहाव्या दिवशीही भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी सर्व केले आहे.


      

          कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठाणे महानगर पालिकेच्या वतीने २४ विसर्जनाच्या ठिकाणी अँन्टीजन चाचणी केंद्र उभारण्यात आले आहे. या ठिकाणी विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांची अँटीजन चाचणी करण्यात येत आहे. काल पाच दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी आलेल्या २,५५२ भाविकांची अँटीजन चाचणी करण्यात आली असून फक्त एकाच व्यक्तीची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच दीड दिवसाच्या गणपती विसर्जनावेळी १,१९२ तर पाच दिवसाच्या गौरी-गणपती विसर्जनासाठी आलेल्या २,५५२ भाविकांची अशी आतापर्यंत एकूण ३७४४ भाविकांची अँटीजन चाचणी करण्यात आली आहे.

          


        दरम्यान श्रीगणेश विसर्जनाच्या सातव्या व दहाव्या दिवशी देखील महानगरपालिकेच्यावतीने प्रत्येक विसर्जन ठिकाणी उभारण्यात आलेल्या अँटीजन चाचणी केंद्रावर भाविकांनी चाचणी करून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी केले आहे.

  

Post a Comment

0 Comments