■भाजपा कल्याण जिल्हा महिला सरचिटणीस पुष्पा रत्नपारखी यांचे नरेंद्र मोदी यांना पत्र....
कल्याण , कुणाल म्हात्रे : हल्ली महिलांचा विनयभंग व त्यांच्यावर बलात्कार तसेच अत्याचाराचे प्रमाण वाढले असून याला रोखण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये महिला सुरक्षा कायदा मंत्री हे पद निर्मिती करून या पदास योग्य अशा महिला मंत्र्यांची नियुक्ती करावी जेणेकरून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात ठोस निर्णय व कारवाई होऊ शकेल अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. याबाबत भाजपा कल्याण जिल्हा महिला सरचिटणीस पुष्पा रत्नपारखी यांनी नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे.
भारतातील कुठल्या ना कुठल्या राज्यात, काही असामाजिक तत्त्वां कडून महिलांचा विनयभंग, महिलांवर अत्याचार, बलात्कार, घरेलू हिंसा अशा प्रकारचे गुन्हे घडत असतात. तसेच नोकरीच्या ठिकाणी किंवा समाजात वावरताना बऱ्याच वेळा महिलांचे समाजाकडून सुद्धा मानसिक खच्चीकरण होते. महिलांचा मान सन्मान राखणे किंवा महिलांच्या भावना, पीडित महिलांची मानसिकता एक महिलाच खूप चांगल्या प्रकारे समजू शकते.
म्हणून भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात "महिला सुरक्षा कायदा मंत्री" या खात्याची निर्मिती करून योग्य त्या महिला मंत्रीची त्यावर नियुक्ती करण्याची मागणी रत्नपारखी यांनी केली आहे. यामुळे समाजात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात, व महिलांच्या सामाजिक न्याय हक्कासाठी एखादी महिला मंत्रिमंडळात हक्काने बाजू मांडू शकेल असे मत पुष्पा रत्नपारखी यांनी व्यक्त केले.
0 Comments