ग्रीन रेसमध्ये सहभागी असलेल्या सर्वांनीच वृक्ष लागवडीसाठी पुढे येऊन आपलं शहर हिरवंगार करावं - महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  ग्रीन रेसमध्ये सहभागी असलेल्या सर्वांनीच वृक्ष लागवडीसाठी पुढे यावं आणि आपलं शहर हिरवगार करावंअसे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका व न्यास ट्रस्ट यांच्या संयुक्त विदयमानेदि. २६ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर  दरम्यान आयोजिलेल्या "कल्याण-डोंबिवली ग्रीन रेस" च्या पारितोषिक वितरण समारोहात बोलतांना त्यांनी हे आवाहन केले.महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर महापालिकेने अनेक झाडे सामाजिक संस्थांच्या  मदतीने लावलीया आरक्षित भूखंडांवर वृक्षारोपण करण्यासाठी हिरीरीने पुढे येऊन महापालिकेस मदत करावीअसे आवाहन महापालिका आयुक्तांनीन यावेळी केले. ग्रीन रेस हा एक चांगला उपक्रम असून याच्या माध्यमातून अनेकांना निसर्गाच्या जवळ जाण्याची संधी मिळालीयामध्ये २०० झाडांच्या/वृक्षांच्या विविध प्रजातींचे संकलन करण्यात आले. त्याचे एक पुस्तक तयार केले तर विदयार्थ्यांसाठी एक खजिनाच उपलब्ध होऊन असेही पुढे ते म्हणाले.कोविडच्या सर्व नियमांचे पालन करुन काल सायंकाळी सावित्रीबाई फुले कलामंदिरात आयोजिलेल्या छोटेखानी समारंभात न्यास ट्रस्टच्या गायत्री ओक यांनी निसर्गाचे ग्रीन रेस दरम्यान करण्यात आलेल्या नेचर ट्रेलचे  बहारदार सादरीकरण केले. महापालिका क्षेत्रातील वनस्पती प्रेमी आणि निसर्ग प्रेमींना महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या अनमोल वृक्ष संपदेची ओळख होण्याच्या दृष्टीकोनातून तसेच निसर्गाने दिलेल्या या हरित संपत्तीबाबत निसर्ग प्रेमींमध्ये अधिकाधिक रुची वाढवण्यासाठी महापालिका व न्यास ट्रस्टडोंबिवली यांच्या संयुक्त विदयमाने ग्रीन रेसचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध वयोगटातीलविविध व्यवसायातील 35 पथकांनी सहभाग घेतला होता. अनेक पालक आपल्या मुलांसह या ग्रीन रेसमध्ये सहभागी झाले होते. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीशहर अभियंता सपना कोळी-देवनपल्लीमुख्य उदयान अधिक्षक संजय जाधवसहा. जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे यांचे हस्ते ग्रीन रेसमधील विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन तसेच सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आलेतसेच आंबिवली येथील बायो डायव्हरसिटी पार्क   तयार करण्यासाठी महापालिकेस मोलाचे सहकार्य करणाऱ्या वन अधिकारी वैभव वाळिंबे यांचा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक न्यास ट्रस्टचे विश्वास भावे यांनी व सुत्रसंचालन दत्तात्रय लदवा यांनी केले.

Post a Comment

0 Comments