कल्याण ग्रामीण मधील २० हजारहून अधिक नागरिकांचे लसीकरण


■कुणाल पाटील फाउंडेशनच्या प्रयत्नाने चौथे लसीकरण केंद्र सुरू...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण ग्रामीण मधील २० हजारहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. कल्याण ग्रामीण परिसरातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी कुणाल पाटील फाउंडेशन सतत प्रयत्नशील असून आज  मलंगगड रोडवरील गायत्री शाळेत चौथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. यासाठी नगरसेवक कुणाल पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून हे केंद्र मंजूर करून घेतले आहे.कोविड पासून बचावासाठी लसीकरण आवश्यक असून, रेल्वे प्रवास अथवा इतर सार्वजनिक ठिकाणी देखील लसींचे दोन डोस आवश्यक झाले आहेत. यामुळे नागरिक लसीकरणासाठी गर्दी करीत आहेत. कल्याण ग्रामीण मध्ये पुरेसे लसीकरण केंद्र नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. यासाठी कुणाल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून कल्याण ग्रामीण मधील द्वारली, आडीवली, देशमुख होम्स पिसवली याठिकाणी लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आली होती. तरी देखील आणखी लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी नागरिकांकडून होत असल्याने मलंगगड रोड वरील गायत्री विद्यालय येथे लसीकरण केंद्र सुरु करण्यासाठी कुणाल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला.     या पाठपुराव्यानुसार गायत्री विद्यालय येथे लसीकरण केंद्राला मान्यता देण्यात आली असून आज या लसीकरण केंद्राचे नगरसेवक कुणाल पाटील यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. याठिकाणी पहिल्याच दिवशी लसीकरणासाठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिसून आला. या आधी फाउंडेशनच्या माध्यमातून द्वारली आरोग्य केंद्रआडीवली आरोग्य केंद्रदेशमुख होम्स येथील नरेंद्र विद्यालय या ठिकाणी देखील लसीकरण केंद्र सुरू असून आतापर्यंत सुमारे २० हजारहुन अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यापुढे देखील कल्याण ग्रामीण आणि कल्याण पूर्वेतील सर्व नागरिकांना लस मिळण्यासाठी आणखी लसीकरण केंद्रे वाढविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे कुणाल पाटील यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments