गांधी जयंती दिनी सेवानिवृत्त कर्मचा-यांचे आमरण उपोषण निवृत्त्ती वेतनासाठी 'आफ्रोह'च्या वतीने मुक निदर्शने
कल्याण  , कुणाल  म्हात्रे  : अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या कर्मचा-यांना सेवानिवृत्त होऊन दोन वर्ष होत आली तरीही  त्यांना निवृत्तीवेतन नाही, त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या  कर्मचा-यांच्या बाबतीत त्वरीत तोडगा काढावा, या मागणीसाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन राज्य शाखेच्यावतीने महात्मा गांधी जयंतीदिनी २ ऑक्टोबर  रोजी आझाद मैदानावर  आमरण उपोषण करण्याचा इशारा राज्य शासनाला दिला आहे. आमरण उपोषणाच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावरुन पाठिंबा दर्शविण्यासाठी आफ्रोह ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने  जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक निदर्शने करण्यात आली.        डिसेंबर २०१९ पासून आतापर्यत शेकडो कर्मचारी सेवानिवृत्त झाले तर काही अधिसंख्य कर्मचारी नोकरीत असतांना विविध कारणाने मरण पावले. अशा कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन व इतर लाभ त्यांच्या कुटुंबीयांना अद्यापही देण्यात आले नाही. ३० सप्टेंबर २०२१ पर्यत जर सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही तर २  ऑक्टोबर गांधी जयंती च्या दिवशी सेवानिवृत्त कर्मचारी मंत्रालयासमोर आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा आफ्रोहच्या वतीने देण्यात आला आहे.शुक्रवारी कोविड नियमांचे पालन करुन शासकीय विश्रामगृहकोर्टनाका ठाणे येथे  मुक निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद कोळीउपाध्यक्ष अर्जून मेस्त्री, सचिव घनशाम हेडाऊ, कोषाध्यक्ष नरेंद्र भिवापूरकर, पांडुरंग नंदनवाररविंद्र निमगांवकर व इतर ५० ते ६० सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments