ठाणे, प्रतिनिधी : - मुंबई महानगरपालिकेच्या वेशीवर वसलेल्या मीरा भाईंदर शहरात सुरू असलेल्या दहिसर ते भाईंदर या मेट्रो मार्ग क्रमांक 9 मार्गीकेच्या कामाची पाहणी खासदार राजन विचारे यांनी आज सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत केली असून या मार्गातील अडचणी दूर करून मेट्रो मार्गाच्या कामाला गती दिली आहे.
या पाहणी दौऱ्यात खासदार राजन विचारे, आमदार गीता जैन, मीरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, एम एम आर डी ए चे अधीक्षक अभियंता विश्वेश्वर मानकामे, कार्यकारी अभियंता सुधीर परिकर, श्रीमती. योजना पाटील, राष्ट्रीय महामार्गाचे प्रोजेक्ट डायरेक्टर राहुल जालन, त्याच बरोबर टोल विभागाच्या एम एस आर डी सी उपकार्यकारी अभियंता गायकवाड मीरा भाईंदर महापालिकेचे शहर अभियंता शिवाजी बारकुंड तसेच जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते राजू भोईर, प्रवीण पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख विक्रम प्रताप सिंग, शहर प्रमुख पप्पू भिसे, लक्ष्मण जंगम, जयराम मेसे, महिला जिल्हा संघटक स्नेहल सावंत, उप जिल्हा संघटक विद्या कदम, उपशहर संघटक तेजस्विनी पाटील, स्थानिक नगरसेवक हेलन गोविंद जॉर्जी, शर्मिला बगाजी, माजी नगरसेवक संदीप पाटील व इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पाहणी दौऱ्यात दहिसर टोल नाका जवळील पिलर चे काम सुरू करण्यासाठी एम एम आर डी ए च्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या वृक्ष व कमानी तोडण्याची परवानगी न मिळाल्याने काम खोळंबले असल्याची माहिती निदर्शनास आणून दिल्यानंतर खासदार राजन विचारे यांनी झाडांबाबत वन खात्यांच्या अधिकाऱ्यांशी व कमानी बाबत मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याशी चर्चा करून लवकर परवानगी देण्याची विनंती केली आहे.
खासदार राजन विचारे यांनी दहिसर मार्गे येणारी मेट्रो मीरा भाईंदर येथे वळविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे १.०३ किलोमीटरचा कनेक्शन पार्ट जोडण्यासाठी नॅशनल हायवे अथोरिटी प्रायव्हेट लिमिटेड यांची परवानगी आवश्यक असल्याने एम एम आर डी ए आराखडे सादर केले होते. परंतु तांत्रिक अडचणीमुळे त्या आराखड्याला मंजुरी न दिल्याने खासदार राजन विचारे यांनी नॅशनल हायवे अथोरिटी इंडिया कंपनीचे प्रोजेक्ट डायरेक्टर राहुल जालन यांना जाब विचारला असता त्यात त्रुटी आहेत त्या सुधारून आमच्याकडे पुन्हा सादर करावा व तात्काळ परवानगी मिळवून देऊ असे आश्वासन खासदार राजन विचारे यांना दिले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर खासदार राजन विचारे यांनी मंजूर केलेले तीन उड्डाणपूल नागपूरच्या धरतीवर मेट्रो मार्गावर घेण्याची विनंती करण्यात आली होती. त्याप्रमाणे याची कामे सुरू असून त्यामध्ये पिलेर ची उंची २३ मीटर असून रस्त्यापासून ७ मीटर उंचावर उड्डाणपूल व उड्डाणपुलाच्या उंची पासून ७ मीटर वर मेट्रो मार्ग असणार आहे. त्यापैकी पिलेर चे काम ३५ टक्के व स्टेशनची कामे २५% पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच या मार्गावर एकूण ७६० गर्डर असून त्यापैकी ५६ गर्डर स्ट्रैडल कैरीअर या नव्या क्रेनच्या सहाय्याने टाकण्याचे काम सुरू असून भारतात पहिल्यांदाच या क्रेन चा उपयोग मीरा भाईंदर या मेट्रो मार्गासाठी होत असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
सुभाष चंद्र बोस मैदान येथे होणाऱ्या कारशेड शेजारी राई-मुर्धा येथे नवीन मेट्रो स्थानकाची निर्मिती करण्यासाठी प्लान तयार करा अशा सूचना अधिकाऱ्यांना खासदार राजन विचारे यांनी दिली.
0 Comments