महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनची निषेध द्वारसभा
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी आज विवीध संघटनेतर्फे देशव्यापी संप आयोजित करण्यात आला होता. त्याला समर्थन देण्यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन कल्याण परिमंडळच्या वतीने कल्याण मधील तेजश्री बिल्डिंगच्या गेटसमोर निषेध द्वारसभा घेण्यात आली.तसेच नागपूर शहर जयताळा वितरण केंद्र त्रिमूर्ती नगर सबडिव्हीजन,काँग्रेस नगर डिव्हीजन नागपूर येथील वीज ग्राहक वाठ यांच्याकडे ५ हजार थकबाकी वसुली करीता गेले असता वीज ग्राहका कडून तांत्रिक कामगार  सुखदेव केराम यांना लोखंडी रॉडने जबर मारहान करून जखमी केले. या घटनेच्या निषेधार्थ देखील या द्वारसभेचे आयोजन केले होते. फेडरेशनचे संयुक्त सचीव काँ. औदुंबर कोकरे, कल्याण निधी ट्रस्टचे विश्वस्त काँ. जे.आर. पाटील, केंद्रीय सदस्य काँ. अवीनाश शेवाळे यांनी कर्मचाऱ्यांना संबोधीत केले. सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणांचा देखील निषेध व्यक्त केला व जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी काँ. उमा निपाणे केंद्रीय सदस्या, काँ. विक्रम खंडागळे, काँ. दिनेश पाटील, काँ. विनोद गिलबीले, काँ सुर्यकांत माने, काँ. रोहीत खर्डीकर,  काँ. सचीन भारती व इतर पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments