मंदिरं बंद पण आरोग्य मंदिरं सुरू' मुख्यमंत्र्यांचा पुन्हा भाजपला टोला पूल सुरु आता दरी कमी करा- कपिल पाटील यांचा सल्ला
 

डोंबिवली ( शंकर जाधव ) १५ सप्टेंबर २०१९ रोजी कोपर पुल वाहतुकीसाठी बंद केला होता.त्यानंतर लॉकडाऊन मध्ये युद्धपातळीवर प्रशासनाने काम केले. शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या कामाचा पाठपुरावा केल्याने काम जलदगतीने झाल्याने डोंबिवलीकरांनी शिवसेनेचे आभार मानले. तब्बल १४ महिन्यांनी डोंबिवलीकरांची प्रतीक्षा संपली असून मंगळवारी सावित्रीबाई फुले नाट्यगृहात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकापर्ण झाले. तर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी पूल सुरु झाला आता दरी कमी करा असा सल्ला यावेळी दिला.   

 

  


      यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,आयुक्त खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी , आमदार रविंद्र चव्हाण, माजी महापौर विनिता राणे, माजी नगरसेवक मंदार हळबे, स्थायी समितीचे माजी सभापती रमेश म्हात्रे, दिपेश म्हात्रे, राजेश मोरे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी कोपर पुल, तेजस्विनी बससेवा, ऑक्सिजन प्रकल्प, नागरी सुविधा केंद्र, पालिका रुग्णालयातील अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष, टीटवाळा येथील अग्निशमक केंद्र, आंबिवलीतील जैवविविधता उद्यान, शहर दर्शन बससेवा या प्रकल्पांचा समावेश ऑनलाईन लोकापर्ण करण्यात आले.यावेळी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे म्हणाले 'कोव्हिडचा काळ अद्यापही सरलेला नाही. 

       मंगळवारीच मी सर्व पक्षांना माझ्या पक्षासह सर्व पक्षांना एक आवाहन केलं आहे की जबाबदारीने वागा. जबाबदारीने आपण वागलो नाही तर लोक कसे वागतीलहे मी त्यांना सांगितलं आहे. आज मंदिरं जरी बंद असली तरीही आरोग्य मंदिरं असंच ज्यांचं वर्णन केलं पाहिजे अशी रूग्णालयं सुरू आहेत. हॉस्पिटलच्या माध्यमातून ही आरोग्यमंदिरं सुरू आहेत त्यामुळे जनता आशीर्वाद देणार आहे. आरोग्यकेंद्र महत्त्वाचं आहे ते बंद करून मंदिर उघडायचं काबरं मंदिरं कधी उघडणारतर हो आम्ही मंदिरं उघडणार आहोत काही गोष्टी टप्प्याटप्प्याने करणार आहोत. 
    

      भारतमाता की जय एवढ्या घोषणा देऊन थांबत नाही. आम्ही त्या पलिकडे जाऊन हिंदुत्वाची काळजी घेणारे आहोत. लोकांना बरं करण्याच्या दिशेने आपण पाऊल टाकतो आहोत हे महत्त्वाचं आहे.बॅकलॉग ६५००  कोटींचा नेमका किती बॅकलॉग राहिलेला आहे ते बघावे लागेल. आपण जनतेचे सेवक आहोत. आपल्यात मतांतरे असू शकतील तेवढीच लोकशाही आहे. रविंद्र चव्हाण यांनी युतीचे कार्यकर्ते हा उल्लेख महत्वाचा. एकत्र बसा. काय पाहिजे कल्याण डोंबिवलीला ते दिलं हा शब्द मी तुम्हाला देतो असंही मुख्यमंत्री म्हणाले. 

      अनेक चांगल्या गोष्टी कल्याण डोंबिवलीमध्ये झाल्या आहेत त्याचं समाधान आहे. जो काम करतो त्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या जातात.आपणही लोकांची सेवाच करायची आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. जनतेच्या हितासाठी जे काही असेल ते केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असंही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.


          कार्यक्रम संपल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपर पुलावर फीत  कापली. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांगडे,उपजिल्हाप्रमुख राजेश कदम,उपशहरप्रमुख किशोर मानकामे,बाळा म्हात्रे, संदीप सामंत,अनमोल म्हात्रे,राहुल म्हात्रे, सागर जेधे, महिला पदाधिकारी कविता गावंड,किरण मोंडकर, अस्मिता खानविलकर,सीमा अय्यर, गुलाब श्रीधर म्हात्रे आदिसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.     

Post a Comment

0 Comments