डोंबिवली, शंकर जाधव : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा -डोंबिवली या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली.२०२१-२०२६ या कालावधीसाठी कार्यकारिणीत अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक वामनराव देशपांडे, उपाध्यक्षपदी ज्येष्ठ कार्यकर्ता दीपाली काळे कार्याध्यक्षपदी सुरेश देशपांडे, कार्यवाहपदी डॉ.धनश्री साने, सहकार्यवाहपदी गीता नवरे, कोषाध्यक्षपदी आनंद गोसावी यांची निवड झाली. ही निवडणूक बिनविरोध झाली.
कार्यकारिणी सदस्यपदी अशोक नाईक, महेश देशपांडे, विजय जोशी,शीतल दिवेकर,डॉ.वृंदा कौजलगीकर ,उमा आवटे पुजारी, प्रज्ञा जोशी, आरती मुनीश्वर, विलास सुतावणे आहेत.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ध्येय धोरणाशी सुसंगत असेच कार्य आम्ही करून दाखवू आणि भाषा, साहित्य संस्कृती याचे जतन आणि वर्धन निश्चितच करू असा विश्वास नवीन कार्यकारिणीने यावेळी व्यक्त केला.डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाचे सचिव सुभाष मुंदडा यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
0 Comments