प्रविण दरेकरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन
ठाणे (प्रतिनिधी)  -  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी काल एका कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्षाला रंगलेल्या गालाचे मुके घेण्याची सवय आहे, असे वादग्रस्त विधान केले होते. त्या विधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ठाण्यात प्रविण दरेकर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ठाणे शहर महिला कार्याध्यक्षा सुरेखाताई पाटील आणि प्रदेश सचिव शशिकला पुजारी यांनी केले.

  


         लावणी कलाकार सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. या प्रवेशावर बोलत असताना दरेकर यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे अशी टिपण्णी केली होती. त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच, त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले. 

  


       यावेळी प्रदेश सचिव शशिकला पुजारी यांनी, एका कार्यक्रमात महिलांबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी जे विधान केले आहे. त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. प्रविण दरेकर यांनी भान ठेवून बोलावे. जर त्यांनी येत्या 48 तासात केलेल्या विधानाबद्दल माफी मागितली नाही तर महिला राज्यभर तीव्र आंदोलन करतील, असा इशारा पुजारी यांनी दिला.         आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जात असताना. प्रविण दरेकर यांनी जे विधान केले आहे. त्याचा आम्ही निषेध करीत आहोत. त्यांनी लवकरात लवकर माफी मागावी. अन्यथा आम्ही गालाचा रंग काय असतो, हे दाखवून देऊ, असा इशारा यावेळी महिला कार्याध्यक्षा  सुरेखाताई पाटील यांनी दरेकर यांना दिला.           यावेळी  ठाणे शहर कार्याध्यक्ष श्रीमती. सुरेखा ताई पाटील, महाराष्ट्र प्रदेश सचिव श्रीमती. शशिकला पुजारी, श्रीमती. पुनम वालिया, श्रीमती. कांता गजमल, श्रीमती. साबिया मेमन, श्रीमती. मंजु येरुणकर, श्रीमती. अनिता मोटे, श्रीमती. पल्लवी गिंध, श्रीमती. नलिनी सोनावणे, श्रीमती.  ज्योती निबंरंगी, श्रीमती. आरती घोलप, श्रीमती. संगिता चंद्रवंशी, श्रीमती. भानुमती पाटील, श्रीमती. सुवर्णा खिलारी, श्रीमती. रजिंता गुळेकर, श्रीमती. गायत्री आर्यमाने, श्रीमती.  प्रतिभा पुर्णेकर, श्रीमती. लता सुर्यवंशी, श्रीमती. रेणुका अलगुडे, श्रीमती. सुरेखा गायकवाड, श्रीमती. सुरेखा शिंदे, श्रीमती. स्नहेल चव्हाण. आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments