कल्याण डोंबिवली कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने दोन लाख रुपयांच्या धनादेश सुपूर्द
डोंबिवली : ( शंकर जाधव ) कल्याण डोंबिवली कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने कोरोना काळात मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील विधवा महिला  वारसांना दोन लक्ष रुपयांचे धनादेश  कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यलेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे आणि माजी महापौर रमेश जाधव यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला. पतसंस्थेची आकरावी सर्वसाधारण सभा २९ महापालिका भवन स्थायी समितीच्या सभागृहात पार पडली.

        कोरोना काळात अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या जिवाची बाजी लावून कोरोनाशी लढा दिलाअनेक कर्मचारी हे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांची कुटुंबे देखील बाधित झाली. तर काही मृत्यूमुखी देखील पडले. राज्य शासनाने आणि  महापालेकेने खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली, परंतु खर्च मिळाला नसून काही कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या खिशातून खर्च केलाराज्य शासनाने कोरोनामध्ये कर्तव्यावर असलेल्या अधिकारी किंवा कर्मचारी हे मृत्युमुखी पडल्यास पन्नास लाख रुपये कुटुंबातील वारसांना दिले जातील असा आदेश जारी करण्यात आला होता परंतु तसे झाले नाही.

    

         माजी महापौर जाधव यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन चर्चा दरम्यान असे सांगितले होते कीराज्य शासन कर्मचाऱ्यांना मदत देईल तेव्हा देईल परंतु आपल्या पालिकेच्या वतीने कोरोना कार्यकाळात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांना किमान पाच लाख रुपयांची मदत करा असे सांगितले होते. तसेच पतसंस्थेच्या वतीने जे कर्मचारी संघटनेचे सभासद आहेत त्यांचा ग्रुप विमा काढण्यात आला असून एकूण ३५० सदस्य संख्या असलेल्या सर्व सदस्यांचा विमा भविष्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन पतसंस्थेने भीमराव साळवे आणि मंगेश जाधव यांच्या परिवारास दोन लक्ष रुपयांचे धनादेश दिला. 

          मागील वर्षी १ लाख रुपये देण्यात आले होते. त्यामध्ये या वर्षी वाढ करून २ लाख रुपयांची मदत केली. या प्रसंगी मंगल भीमराव साळवे यांनी पतसंस्थेने केलेल्या दोन लाखाच्या मदतीतून १० हजार रुपये संस्थेच्या कल्याण निधीसाठी खजिनदार कल्पना खरात यांचेकड़े धनादेश दिला. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पोळगायकवाडसमाधान मोरे, विजय सरकटे, कल्पना खरात, अनघा पवार, पौर्णिमा कांबळेसंचालक मंडळ काम करीत आहे. संस्थेचे भाग भांडवल १० हजारावरून १० वर्षात तीन करोड रुपयांवर गेले आहे.

Post a Comment

0 Comments