Header AD

कल्याण येथील लोकन्यायालयात १९५१ प्रकरणे निकाली
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : शनिवारी कल्याण तालुका विधी सेवा समितीतर्फे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये एकुण ७६२४ दिवाणी व फौजदारी प्रकरणेकौटूंबिक वाद प्रकरणेचेक संबधीची फौजदारी प्रकरणेबॅक वसुली प्रकरणेमोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणेवीजबीलासंदर्भातील प्रकरणे तसेच न्यायालयात वाद दाखलपुर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते.         यापैकी एकुण १९५१ दिवाणी व फौजदारी प्रकरणे निकाली काढण्यात आले असुन त्यात एकुण रु. ६,२१,८१,०१३/- ची रक्कम नुकसान भरपाईवीज बिल वसुलीबँकांची ऋण वसुली इत्यादी म्हणून संबधीतास अदा करण्यात आलेली आहे. या लोकन्यायालयात मोठया संख्येने पक्षकारअधिकारीइन्सुरन्स कंपन्याचे अधिकारीवाहतुक शाखेचे अधिकारी व वीज वितरण कंपनीचे अधिकारी हजर होते. वीजबिल बाबतच्या एका फौजदारी प्रकरणात ४ हजार ६०० रुपये  भरणे आवश्यक होते.            परंतु या प्रकरणातील पक्षकार स्त्री ही गरीब असल्या मुळे तिच्याकडे फक्त रक्कम ३ हजार ५०० रुपये होते. उर्वरित रक्कम जिल्हा न्यायाधीश राजीव पांडेशिवाजी कचरेवीज वितरण कंपनी अधिक्षक अभियंता डी आर पाटील व दिलीप भोळे व वकील महेश बोरूडे यांनी अदा केल्यामुळे सदर प्रकरण निकाली काढण्यात आले.हे लोकन्यायालय यशस्वी केल्याबद्दल जिल्हा न्यायाधीश - १ तथा कल्याण तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष राजीव पी. पांडे यांनी सर्व पक्षकारलोक न्यायालयात सहभागी झालेले वीज वितरणइन्शुरन्सबॅक वाहतुक शाखेचे अधिकारीन्यायीक अधिकारीविधीज्ञ व न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत.


कल्याण येथील लोकन्यायालयात १९५१ प्रकरणे निकाली कल्याण येथील लोकन्यायालयात १९५१ प्रकरणे निकाली Reviewed by News1 Marathi on September 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads