कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण पूर्वेतील कैलास नगर, खडेगोळवली परिसरात गुन्हेगारी आणि चोरीचे प्रमाण वाढत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या हेतूने राष्ट्र कल्याण पार्टीच्या वतीने याठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावण्यात आले असून याचा लोकार्पण नुकताच करण्यात आला.
येत्या काही महिन्यात कल्याण डोंबिवली महानगपालिकेची निवडणुक होणार असल्याने पालिका क्षेत्रात या निवडणुकीचे बिगुल वाजल्याचे पहायला मिळत आहे. यामध्ये राष्ट्र कल्याण पार्टी देखील कामाला लागली असून राष्ट्र कल्याण पार्टीच्या कल्याण पूर्वेतील सह्याद्री नगर येथे पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
तर वाढती गुन्हेगारी आणि चोरीचे प्रमाण लक्षात घेऊन खडेगोळवली रोड आणि शंकर पावशे रोड, कैलाश नगर येथे सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावण्यात आले. राष्ट्र कल्याण पार्टीचे पदाधिकारी प्रमोद चौहान यांच्या कार्यालयाचे उद्घाटन आणि सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लोकार्पण राष्ट्र कल्याण पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शैलेश तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राष्ट्र कल्याण पार्टीचे महासचिव राहुल काटकर, सचिव विनय सिंह, कल्याण जिल्हाध्यक्ष हर्षल साळवी, युवक प्रदेश सचिव प्रवीण के. सी., कल्याण युवक जिल्हाध्यक्ष पवन दुबे, किरण शेळके, राज द्विवेदी, सूरज सिंह, संजय यादव, विवेक सिंह, दुर्गेश मिश्रा आदी जण उपस्थित होते.
तसेच उपाध्यक्ष भाजपा उत्तर भारतीय सेल राकेश मिश्रा, वार्ड अध्यक्ष उत्तर भारतीय सेल अरविंद मिश्रा, वार्ड उपअध्यक्ष उत्तर भारतीय सेल सुभाष गुप्ता, वार्ड सचिव उत्तर भारतीय सेल बाबा मिश्रा, शक्ती केन्द्र प्रमुख बीजेपी वार्ड क्र. १०३ संतोष शर्मा, बूथ प्रमुख अवनीश मौर्य, महिला वार्ड सचिव माधुरी चौबे, वार्ड सचिव प्रकाश मौर्य, वार्ड उपअध्यक्ष राजेंद्र पांडे, सुमित मिश्रा, विजय मिश्रा, विवेक शर्मा, अभिषेक मिश्रा आदींसह विविध पक्षांच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी राष्ट्र कल्याण पार्टी मध्ये प्रवेश केला.
0 Comments