कल्याण रेल्वे स्थानका वरील घटना

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण रेल्वे स्थानकावर आरपीएफ महिला जवानाची सतर्कता आणि धाडसामुळे एका प्रवाशाचे प्राण वाचले आहेत. कल्याण रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक चार वर दुपारी पावणे बारा च्या सुमारास गोदान एक्सप्रेस आली. यावेळी रमाशंकर पाल हे एक्स्प्रेस मध्ये असलेल्या आपल्या नातेवाईकाला बॅग देत होते.               याच दरम्यान ट्रेन सुरू झाल्याने तोल गेल्याने रमाशंकर  फलाटावर पडले. याच दरम्यान त्या ठिकाणी आरपीएफ जवान  राधिका सेन व वैशाली पटेल या तिकडे तैनात होत्या. या दोघींनी प्रसंगावधान राखत पाल यांच्या दिशेने धाव घेत त्यांना बाहेर खेचले त्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान आरपीएफच्या महिला जवानांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.


Post a Comment

0 Comments