इंधन दरवाढीचा फटका बाप्पालाही बैलगाडी वरून मिरवणूक काढत पेट्रोल डिझेल दरवाढीचा केला निषेध
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  दररोज वाढणाऱ्या इंधनांच्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असतांनाच याच इंधन दरवाढीचा फटका गणपती बाप्पाला देखील बसला आहे. पेट्रोलडिझेलघरगुती गॅस प्रचंड महाग झाले असल्याने कल्याणमधील विजय तरुण मंडळाच्या गणपती बाप्पाची विसर्जनाची मिरवणूक बैलगाडीतून काढण्यात आली.                या केंद्र सरकारला महागाई कमी करण्याची सद्बुद्धी दे अशी विंनती यावेळी गणरायाकडे करण्यात आली. यावेळी इंधन दरवाढी विरोधात केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. 

Post a Comment

0 Comments