ठाणे जिल्हातील खेळाडूंचे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये घवघवीत यश
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  नुकत्याच  रोहतक, हरियाणा येथे स्टुडन्ट ओलंपिक असोसिएशन ऑफ इंडिया व स्टुडन्ट ओलंपिक असोसिएशन हरियाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या स्टुडंट्स ओलंपिक नॅशनल स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्यातील अथलेटिक्स फुटबॉलयोगा व कॅरम मधील ६० खेळाडू सहभागी होऊन घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत देशातील १७ राज्यांमधील ९००  खेळाडूंनी सहभाग घेतला होता. कोरोना काळ सुरू झाल्यानंतरची ही पहिलीच स्पर्धा असल्यामुळे स्पर्धेला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते. अथलेटिक्स या खेळा मध्ये मुलांमध्ये १२ वर्षाखालील गटात आलोक आव्हाड- कल्याण १००/२०० मी. धावणे व लाँग जंप मध्ये सुवर्ण पदक, प्रसाद गायधनी- कल्याण २०० मी. धावणे रौप्य पदक, आस्था काळदाते- कल्याण लाँगजंप व १०० मीटर धावणे  सुवर्ण पदक पटकावले. १४ वर्षाखालील गटात अथर्व महाडिक कल्याण १००/४००/८०० मी. धावणे यामध्ये सुवर्ण पदक पटकावले. जिया आलिया बिजु – डोंबिवली १०० मी. धावणे रौप्य पदक तर २०० मीटर धावणे सुवर्ण पदक, शार्दुला रोटे तनिष्क मांजी  व खुशाल तिवारी सर्व कल्याण गोळा फेक सुवर्णपदक प्राप्ती शेट्टी – डोंबिवली ८०० मी. धावणे रौप्य पदक, गायत्री जोशी- कल्याण ४०० मी सुवर्णापदक, २०० मी रौप्य पदक पटकावले. १७ वर्षाखालील गटात अमन टोले- अंबरनाथ १५०० मीटर धावणे कांस्यपदक, अंकित पाल- कल्याण ४०० मी. कास्यपदक, ८०० मी रौप्य पदक, हर्शिद निषाद- उल्हासनगर १०० मी. रौप्य पदक मिळविले आहे. तर  २२ वर्षाखालील गटात जयेश चव्हाण- बदलापूर सुवर्णपदक, योगा १४ वर्षाखालील गटात प्रसाद गायधनीकल्याण- सुवर्ण पदक श्रेया शिंदे- डोंबिवली सुवर्ण पदक, कॅरम १९ वर्षाखालील गटात आरती धवन-कल्याण सुवर्ण पदक, बिपिन पांडे – वसई सुवर्णपदक, आशुतोष गिरी- नालासोपारा सुवर्णपदक अविराज आडके- विरार सुवर्णपदक, महेश रायकर -  वसई - यांनी रौप्यपदक पटकावले.या स्पर्धेत सर्व खेळाचे प्रशिक्षक म्हणून शांती माजीक्रांती रोटे,  मुकुंद गायधनीराजू सुतार,  अरुण कांजीलालपर्थ दिवेदी,  विलास भावे,  यांनी परिश्रम घेतले. स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन ठाणे जिल्ह्यात गेल्या ७  वर्षा पासून कार्यरत असून शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी काम करत आहे. यापुढे ही नोव्हेबर, डिसेंबरमध्ये आठव्या स्टुडंट्स ओलंपिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात जास्तीत जास्त जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन ठाणे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती क्रीडा प्रशिक्षक अविनाश ओंबासे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments