कल्याण , कुणाल म्हात्रे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,कल्याण जिल्ह्याचा अभ्यासवर्ग २५ व २६ सप्टेंबर रोजी कल्याण मधील अभिनव विद्या मंदिर येथे पार पडला. या अभ्यासवर्गात अभाविप परिचय, सैद्धांतिक भूमिका, व्यवहारिक सत्र, प्रवास व संपर्क, मुलाखत सत्र, कार्यपद्धती व कार्यकर्ता व्यवहार,भाषण सत्र, सक्षम शाखा, आदी सत्रांचा समावेश होता.
या वर्गाचे उद्घाटन कोंकण प्रांत मंत्री प्रेरणा पवार यांच्या हस्ते झाले. वर्गातील विविध सत्राची मांडणी कोंकण प्रांत मंत्री प्रेरणा पवार, क्षेत्रीय संघटन मंत्री देवदत्त जोशी, तन्मय धर्माधिकारी, आदर्श बिरादार, अमोल शिंदे, आलोक तिवारी, शंकर संगपाळ, पूर्वकार्यकर्ते सदाशिव चव्हाण, पूर्वकार्यकर्ते गणेश गंगाधरे, पूर्वकार्यकर्ते सुबोध पटवर्धन,राष्ट्रीय कार्यकारणी विशेष निमंत्रित सदस्य तसेच विभाग प्रमुख प्रा. डॉ. वरदराज बापट यांनी केली. तसेच यावेळी कल्याण जिल्हा कार्यकारणी देखील घोषित करण्यात आली. या अभ्यासवर्गात २९ विद्यार्थी, १० विद्यार्थिनी, २ प्राध्यापक उपस्थित होते.
0 Comments