कल्याण मध्ये गँस सिलेंडर स्फोटात एक जण गंभीर जखमी

 


कल्याण , कुणाल  म्हात्रे : कल्याण पश्चिमेत घरगुती गँस सिलेंडर गळतीमुळे झालेल्या स्फोटात एक जण गंभीर भाजल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.                   

कल्याण पश्चिमेतील कोळवली परिसरातील सिसोदिया आर्केड इमारतील ३रा माळ्यावर राहणाऱ्या  बैनीवाल यांच्या घरातील घरगुती गँस सिलेंडर गळतीमुळे गँस सिलेंडर चा स्फोट झाला आहे. त्यामध्ये  स्वयंपाक घरातील फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक समानाचे आगीमुळे प्रचंड नुकसान झाले. अग्निशमन दलाने गुरुवारी रात्री ११:१५ वा. सुमारास घटनास्थळी धाव घेत आग लागलेले दोन सिलेंडर विझवत खाली आणुन आगीवर नियंत्रण मिळवले असल्याची  माहिती अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख विनायक लोखंडे यांनी दिली.  सिलिंडेर स्फोटात कुष्णकुमार बैनीवाल हे गंभीर जखमी झाले. सुदैवाने त्यांची पत्नी आणि मुले बिल्डिंगच्या खाली गेली असल्याने संभाव्य दुखापती पासुन बचविले. कुष्णकुमार बैनीवाल यांना उपाचारर्थ रूग्णालयात नेले असुन पोलीस तपासाअंती नेमकी घटना कशामुळे घडली हे सामारे येईल.

Post a Comment

0 Comments