१९ वर्षा खालील मुंबई क्रिकेट महिला संघात श्री माँ विद्यालयाच्या महेक पोकर आणि प्रज्ञा भगत यांची निवड

  


मुंबई, दि. १४ : -  राजकोट येथे होणाऱ्या १९ वर्षाखालील एक दिवसीय मालिकेसाठी मुंबई क्रिकेट महिला संघात ठाण्याच्या श्री माँ शाळेतील महेक पोकर आणि प्रज्ञा भगत यांची निवड करण्यात आली आहे.  महेकची संघात निवड होण्याची ही दुसरी वेळ आहे.  निवड समितीने याची मुंबईमध्ये अधिकृत घोषणा केली.            मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या महिला अंडर -19 निवड समितीमध्ये संगिता कटवारे (चेअरवुमन), अपर्णा चव्हाण, सुषमा माधवी, शीतल सकरू आणि श्रद्धा चव्हाण यांचा समावेश आहे. महिला एकदिवसीय लीग सामने 28 सप्टेंबर 2021 पासून राजकोट येथे खेळले जाणार आहेत. यासाठी २२ जणांच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे.          श्री माँ शाळेत शिकणाऱ्या महेक पोकर आणि प्रज्ञा भगतयांच्या नावाची या संघात निवड करण्यात आल्याने आनंद व्यक्त होत आहे. महेक ही उत्तम यष्टिरक्षक असून एक चांगली फलंदाज आहे. तर प्रज्ञा भगतही डावखुरी मध्यम गतीची गोलंदाज आहे. क्रिकेट प्रशिक्षक दर्शन भोईर, प्रतीश भोईर आणि जयेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनखाली दोघी क्रिकेट चे धडे घेत आहेत.

Post a Comment

0 Comments