पालिका कार्यालयावर नागरिकांसह राष्ट्रवादी काढणार हंडा - कळसी मोर्चा
डोंबिवली ( शंकर जाधव )  अनेक वर्षापासून भोपर देसलेपाड्यात पाणी टंचाईने रहिवाशी पुरते कंटाळले आहेत.त्या परिस्थितीमुळे टॅकर माफियाचे सुगीचे दिवस आले आहे. त्यामुळे हा प्रभाग टॅकरमुक्त कधी होणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.चार दिवसांपूर्वी पाणी भरताना महिलेचा हात फॅक्चर झाला होता.या परिस्थितीवर राष्ट्रवादीने पालिका प्रशासनावर निशाणा  साधला आहे.प्रशासन नागरिकांना पाणी देत नसतील तर पालिका कार्यालयावर राष्ट्रवादी रहिवाश्यांना घेऊन हंडा – कळसी मोर्चा काढू असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे.        भोपर देसले पाड्यात कमी दाबाने पाणी होत असतो. एका टॅकरसाठी सुमारे दीड हजार रुपये मोजावे लागत असल्याने नागरीक वैतागले आहेत. पाणी भरताना एका महिलेचा हात फॅक्चर झाल्याने नागरीक संतापले असून अजून किती दिवस प्रशासन आमच्या सहनशीलतेच किती अंत पाहणार आहात असा प्रश्न येथील रहिवासी विचारत आहेत. यावर राष्ट्रवादीचे जिल्हा सचिव एड ब्रम्हा माळी यांनी पालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देत का देत नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे.
           भोपर देसले पाड्याची सुमारे १८ हजार लोकसंख्या असून गेल्या सहा वर्षापासून येथील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.२७ गाव पालिकेत समाविष्ट होऊन सहा वर्ष उलटली तरी नागरिकांचा पाणी प्रश्न सुटला नाही. सर्व पक्षीय समिती सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रश्न सुटला नाही. प्रशासन नागरिकांकडून मालमता कर आणि पाणी कर घेते.असे असताना पाणी देण्यास प्रशासन का कानाडोळा करत आहे ? 
      या प्रभागाला पाण्यापासून वंचित करण्याचा अधिकारी प्रशासनाला नाही.यावर राष्ट्रवादी नागरिकांना घेऊन पालिकेच्या कल्याण  येथील मुख्यालयावर हंडा-कळसी मोर्चा काढू असा असा इशारा दिला आहे.

Post a Comment

0 Comments