पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरा समोर आत्मदहनाचा इशारा


■पाच वर्षापूर्वी दिव्यागांचा स्टॉल रस्ता रुद्दीकरणात जाऊनही पुनर्वसन नाही..


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करून दखल घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. असे असताना पाच वर्षे पुनर्वसन न झालेल्या दिव्यांग दाम्पत्याने २ आक्टोंबर रोजी जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरा समोरच आत्मदहनाचा इशारा दिला आहे. या मुळे आता तरी पालिका प्रशासन या विषया कडे गांभिर्याने पडणार की नाही असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.कल्याण जवळील मोहने येथील दिव्यांग शंकर साळवे व त्यांची पत्नी संगीता साळवे यांचा कल्याण स्टेशन जवळ आरे सरिता दूध व्यवसायाचा स्टॉल रस्ता सुशोभीकरणात तोडण्यात आला होता. पण गेली पाच वर्षे पाठपुरावा करूनही या दिव्यांग दाम्पत्याचे पुनर्वसन झालेले नाही. यामुळे कंटाळून कर्जबाजारी झालेल्या या दिव्यांग दाम्पत्याने पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे. कल्याण डोंबिवली मनपा  स्मार्ट सिटी अंतर्गत रस्ता रुंद्दीकरणात महाराष्ट्र शासनाने मंजुर केलेला आरे सरिता दूध व्यवसायाचा स्टॉल पाच वर्षा पूर्वी कोणतीही पूर्व सूचना न देता तोडण्यात आला. मात्र अजून ही मनपाने दिव्यांग कुटुंबांचे पुनर्वसन केलेले नाही पाच वर्षांपासून पाठपुरावा करूनही अधिकारी कोणताच निर्णय घेत नाही असा आरोप या बाबत दिव्याग शंकर साळवे यांनी केला आहे.कल्याण डोंबिवली मनपा अधिकाऱ्यांकडे हे दिव्यांग दांपत्य पुनर्वसनाची मागणी करत आहे. अधिकाऱ्यांच्या दारात तासंतास बसूनही निराशा मिळत आहे. या बाबत पालिकेच्या उपायुक्त पल्लवी भागवत यांची भेट घेण्यासाठी दिव्यांग संगिता साळवे या दोन तास केबिन बाहेर बसूनही त्यांना भेट दिली गेली नाही. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करून सूचना दिल्या असल्या तरी देखील अधिकाऱ्यांवर या बाबत परिणाम झालेला दिसून येत नसल्याने शेवटी या दिव्यांग दांपत्याने आत्मदाहनाचा शेवटचा इशारा दिला आहे.

Post a Comment

0 Comments