डोंबिवलीतील बलात्कार प्रकरणाचा विद्यार्थी भारती कडून कल्याणात निषेध आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  डोंबिवलीतील बलात्कार प्रकरणाचा विद्यार्थी भारती कडून कल्याणात निषेध व्यक्त करीत संबंधित आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली.देशात अनेक ठिकाणी तसेच महाराष्ट्रात सुद्धा दिवसेंदिवस बलात्काराच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे.  डोंबिवलीमध्ये १५ वर्षीय मुलीवरील सामूहिक बलात्काराने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. प्रत्येक दिवशी अश्या बातम्या वाचून अस्वस्थता वाढत चालली आहे. ह्या सर्व प्रकाराचा शेवट केव्हा असेल ह्याचं उत्तर कुठेच सापडत नाही. या प्रकरणाबद्दल कारवाई करण्यात यावी याकरिता विद्यार्थी भारतीने मानपाडा पोलीस ठाण्यात निवेदन दिले असल्याची माहिती विद्यार्थी भारती राज्यध्यक्षा पूजा मुधाने यांनी दिली.         सोबतच आज दुपारी कल्याण तहसीलदार कार्यालयावर विद्यार्थी भारती तर्फे घडलेल्या प्रकरणाचा निषेध नोंदवत कल्याण मध्ये विविध ठिकाणी काउन्सिलिंग सेंटर उभे रहावेत अशी मागणीही करण्यात आली. ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी तरुण पिढीने पुढे यावे असे आव्हान विद्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी केले.        ही घटना प्रचंड लाजिरवाणी असून ह्यासाठी ग्रामपंचायत लेव्हलवर, गाव पातळीवर महिलांच्या सुरक्षेसाठी व्यवस्था असावी. तसेच काउंसीलिंग सेन्टर्स उभारल्या जाव्यात ह्या मागणीचे समर्थन करत कल्याण पूर्वचे माजी नगरसेवक व कल्याण विकासिनीचे अध्यक्ष ऍड. उदय रसाळ यांनी घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला. 

Post a Comment

0 Comments