कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी सॉलिटर हाँल सील प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांची धडक कारवाई

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी सॉलिटर हाँल सील करण्यात आला असून प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांनी धडक कारवाई केली आहे.           कल्याण पश्चिमेतील सॉलिटर हॉल मध्ये सोमवारी गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर दांडिया क्वीन गायिका फाल्गुनी पाठक यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गाणी ऐकण्यासाठी नागरिकांनी विशेषतः तरुण तरुणींनी एकच गर्दी केली होती. गर्दी तर सोडाच मात्र गाणी सुरू होताच जमलेल्या लोकांना ना मास्क चे भान राहिले ना सोशल डिस्टसिंगचे. कोरोना नियमांची पायममल्ली या कार्यक्रमात झाल्याचे दिसून आले. या कार्यक्रमाचा व्हिडियो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होता.             सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली असली तिसऱ्या लाटेचा धोका आजही कायम आहे. रुग्ण संख्या कमी होत असल्याने अर्थ व्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून सरकारने लोकडाऊनमधील निर्बध शिथिल केलेत. मात्र तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पाहता नागरिकांना मास्क वापरणे, सोशल डिस्टसिंग ठेवणं, अनावश्यक गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. 
               मात्र त्यानंतर देखील नागरिकांकडून सुरू असलेली बेफिकिरी ही धोक्याची घंटा ठरू शकते. असे असताना   या कार्यक्रमात सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडाल्याने महापालिका आयुक्त डॉ . विजय सुर्यवंशी यांच्या निर्देशानुसार प्रभाग क्षेत्र अधिकारी  राजेश सावंत यांनी मंगळवारी रात्री ९ वाजता हा हॉल सील केला. तसेच  पुढील कायदेशीर कारवाई करून नियमानुसार दंड आकारण्यात येणार असल्याचे प्रभागक्षेत्र आधिकारी राजेश सावंत यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments