अचानक लोकलच्या लेडीज डब्यातून गायब झालेल्या महिलेचा शोध सुरु... कोपर रेल्वे स्थानकातील घटना

   डोंबिवली (शंकर जाधव ) तीन वर्षापूर्वी प्रेमविवाह करून ती पतीच्या घरी आली. सर्व काही सुखाने चालले असताना संसारला नजर लागली.पती सोबत लोकलने प्रवास करण्यासाठी ती लेडीज डब्यात गेली, ठाणे रेल्वे स्थानकात पती लोकलमधून उतरले. मात्र ती रेल्वे स्थानकात उतरलीच नाही. पतीने रेल्वे स्थानकात सर्वत्र शोध घेतला. परंतु तिचा कुठेही शोध लागला नाही.पतीने डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात पत्नी हरवल्याची नोंद केली आहे.या घटनेला दोन वर्ष उलटली असून रेल्वे पोलिस महिलेचा शोध घेत आहेत.   डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, शिनू अमन शेट्टी ( २०, रा, सद्गुरू कृपा चाळ,कोपर रेल्वे स्टेशन समोर ) यांचे अमन प्रवीण शेट्टी यांच्याशी २०१८ साली विवाह झाला होता.लग्नाआधी शिनू यांचे नाव मोहोसिना अन्सारी असे होते. दोघांचा संसार सुखाचा सुरु होता.एरोली जाण्यासाठी दोघांनी १ जून २०१९ रोजी कोपर रेल्वे स्थानकात आले. ठाणे रेल्वे स्थानकात उतरण्याचे सांगून अमन हे कोपर रेल्वे स्थानकातील लोकलमधील जनरल डब्यात चढले.      तर त्यांची पत्नी शिनू या लेडीज डब्यात चढल्या.लोकल ठाणे रेल्वे स्थानकात आल्यावर अमन लोकलमधून उतरले. ठाणे रेल्वे स्थानकात पत्नी शिनूचा अमान यांनी शोध घेतला. मात्र रेल्वे स्थानकात कुठेही दिसल्या नाही. अखेर अमन यांनी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात पत्नी हरवल्याची त्याच दिवशी नोंद केली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी शिनू यांचा शोध घेणे सुरु ठेवले आहे. शिनू यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास डोंबिवली रेल्वे पोलीस ठाणे दूरध्वनी क्र.- ०२५१-६७६४१३५ किंवा तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक काळे ९८२१८५ ७२७०, ७८७५३४६८५६ यावर संपर्क साधावा अशी विनंती केली आहे.

Post a Comment

0 Comments