मराठी चित्रपट समितीवर सदस्यपदी वर्षा गुजर-जगताप यांची नियुक्ती

 डोंबिवली ( शंकर जाधव ) महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या मराठी चित्रपट समितीवर सदस्यपदी वर्षा गुजर-जगताप यांची नियुक्ती झाली आहे.हि नियुक्ती पाच वर्षासाठी असून यात ५९ जणांची नियुक्ती झाली. वर्षा गुजर-जगताप ह्या कॉंग्रेस कल्याण-डोंबिवली महिला उपाध्यक्ष आहेत.कल्याण-डोंबिवलीत  वर्षा गुजर-जगपात यांच्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.       दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी चित्रपटांचे परीक्षण करून दर्जा निश्चित करण्यासाठी व अर्थसहाय्याची शिफारस करण्यासाठी समितीची पुनर्रचना करण्यात आली. या समितीवर अशासकीय सदस्या आहेत.

Post a Comment

0 Comments