महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने शिक्षकांची आरोग्य तपासणी
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षक सेना कल्याण आणि आरएसपी युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने व शिक्षक सेना कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रशांत भामरे आणि आरएसपी युनिट कमांडर मणिलाल शिंपी यांच्या पुढाकाराने साई स्वस्तिक हॉस्पिटल कल्याण येथे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी रविवारी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिक्षक सेनेचे प्रान्ताध्यक्ष तथा राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर (कॅबिनेट मंत्री दर्जा)तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व हातमाग महामंडळाचे अध्यक्ष राज्य मंत्री दर्जा प्रकाश पाटीलकल्याण-डोंबिवली शिवसेनेचे महानगरप्रमुख विजय साळवी, मुंबई शिक्षक सेना अध्यक्ष अजितजी चव्हाणउपाध्यक्ष अरविंद नाईक मुंबई विभाग कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक सेना अध्यक्ष विशाल बावामाजी नगरसेवक सुनील वायले आदींच्या  समवेत शिक्षक सेनेचे व आरएसपी युनिटचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमानंतर मुंबई विभाग कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक सेना अध्यक्ष विशाल बावा यांच्या निवासस्थानी अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सभा संपन्न झाली. या सभेत त्यांनी कल्याण व परिसरातील शिक्षक बंधू भगिनींना भेटूनसमस्या ऐकून घेवूननिराकरण करण्यासाठी संबंधित अधिकारी यांना  सूचना केल्या.यावेळी मुंबई विभाग शिक्षक सेना अध्यक्ष अजित चव्हाणउपाध्यक्ष अरविंद नाईकमुंबई विभाग कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक सेना सरचिटणीस विशाल पाटील, मुंबई विभाग कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक सेना कार्याध्यक्ष जगदीश भगतमुंबई विभाग कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक सेना उपाध्यक्ष शशिकांत राजपूत,  मुंबई पश्चिम कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक सेना अध्यक्ष सुनिल देसलेठाणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक सेना कार्याध्यक्ष अर्जून उगलमूगलेइतर पदाधिकारी व शिक्षकगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नंतर बदलापूर येथे कोकण विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या शिवभक्त विद्या मंदिर येथेही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्या ऐकून घेवून अभ्यंकर यांनी अधिकारी वर्गास फोनवरून सूचना केल्या असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना राज्य समन्वयक नितीन चौधरी यांनी दिली.

Post a Comment

0 Comments