महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यात सरकार अपयशी – प्रवीण दरेकर
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यात सरकार अपयशी ठरत असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणी आज विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मानपाडा पोलीस ठाण्याला  भेट देत पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.राज्यात घडणाऱ्या या घटनानांना गृहखाते जबाबदार असून सरकार या घटना रोखण्यात सरकार अपयशी ठरत आहे. एकामागोमाग घटना घडत असतांना सरकारची साधी एक व्यापक बैठक नाही या बद्दल त्यांनी सरकारवर टीका केली. त्याच बरोबर पुण्यातील वरिष्ठ  पोलीस अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी जो पर्यंत भर चौकात खून होत नाही तो पर्यंत कायदा सुव्यवस्था बिघडली असे म्हणता येणार नाही असे म्हणाले. त्यांचे हे बोलणे म्हणजे सरकारच्या संगतीचा परिणाम आहे अशी गंभीर  टीका दरेकर यांनी केलीय.यावेळी त्यांनी महापालिकेत आणलेल्या प्रभाग रचनेत बद्दल देखील प्रतिक्रिया देत सरकारवर टीका केली. तर शक्ती कायदा दीड वर्ष झाला अस्तित्वात आला नाही, तो लवकर आणण्यासाठी विरोधी पक्ष देखील सोबत असल्याचे दरेकर म्हणाले.

Post a Comment

0 Comments