मुंबईत दररोज ९० तर ठाणे जिल्ह्यात ७० जणांचा हृदय विकाराने मृत्यू....

डोंबिवली ( शंकर जाधव )  :  कोरोनातील निर्बंधांमुळे वर्क फ्रॉम होम यामुळे तणाव आणि बैठी जीवनशैली यामुळे या दोन वर्षात तरुण वयातच हृदयविकाराच्या झटक्यामध्ये वाढ झाली आहे. मुंबईत दररोज ९० तर ठाणे जिल्ह्यात ७० जणांचा हृदयविकाराने मृत्यू होत असल्याची भीती बाज. आर. आर. रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केली.             हृदय विकारा संदर्भातील सर्व तपासण्या वेळेत कराव्या असे आवाहन यावेळी डॉक्टरांनी केला आहे.जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने बाज आर.आर. रुग्णालयात हृदय विकरासंदर्भात मोफत चाचणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी तज्ञ डॉक्टरांनी आपले मत व्यक्त केले.         बाज आर.आर.रुग्णालयात जागतिक हृदय दिनानिमित्त हृदयविकार संबंधित चाचण्या शिबिरांचे मोफत आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अँन्जोप्लास्टी,  बायपास, ईसीजी, शुगर इत्यादी मोफत तपासणी करण्यात आली. या तपासणीचा लाभ डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील अनेकांनी घेतला.           यावेळी हॉस्पिटलचे संचालक डॉ.अमीर कुरेशी, डॉ. भरत तिवारी, डॉ.जेकब थॉमस  आणि हॉस्पिटलचे वैद्यकीय कर्मचारी , परिचारिका आदी उपस्थित होते. कोरोना काळातील टाळेबंदीतील निर्बंधांमुळे बैठी जीवनशैली आणि अनिवार्य झाली होती.
          त्यातच वाढत्या कामाचा ताण, व्यायमाचा अभाव, असंतोल आहार, औषधांचा मारा यामुळे सर्व वयोगटातील व्यक्ती हृदय विकाराच्या विकारास बळी पडत असल्याची माहिती सदर रुग्णालयाच्या तज्ञ डॉक्टरांनी दिली. यासाठी सर्व वयोगटातील व्यक्तींनी तपासण्या करणे अंत्यंत आवश्यक असल्याचे बाज आर आर रुग्णालयातील तज्ज्ञांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments