ट्रेलची 'माय फ्रेंड गणेशा' मोहीम

 मुंबई, १४ सप्टेंबर २०२१  : गणेशोत्सव हा देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा सर्वात लोकप्रिय भारतीय उत्सव आहे. यानिमित्ताने भारतातील सर्वात मोठे, जीवनशैलीला वाहिलेले सामाजिक वाणिज्य व्यासपीठ ट्रेल या शुभ महोत्सवात सहभागी झाले आहे.     'हम सबका फ्रेंड - हिज हायनेस, लॉर्ड गणेशा' असे अभिवादन करत ट्रेलने 'माय फ्रेंड गणेशा मोहीम सुरू केली आहे. संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करताना, गणेश चतुर्थी प्रियजनांसह घरी त्याच उत्साहाने आणि वैभवाने साजरे करण्याचा या मोहिमेचा मानस आहे.     अर्चना रंजन, तन्वी संघवी, अनुपम पवार, पूजा घर यांसारख्या ट्रेलवरील प्रसिद्ध निर्माते पारंपारिक विधी आणि पाककृतींचे महत्त्व, तसेच पारंपारिक लूक, उत्सवातील मेकअप, मोदक तयार करणे आणि प्रसादाची थाळी तयार करण्याची प्रेरणादायी कथा त्यांच्या अंतरंगासह उलगडतील. या ऑनलाइन सेलिब्रेशनसह गणेश चतुर्थीच्या निमित्ताने भारतातील वैविध्यपूर्ण परंपरांचा जीवंतपणा या व्यासपीठावर जागविता येतील. सोबतच माहितीपूर्ण मजकुरासह वापरकर्ते भरपूर मनोरंजन अनुभवतील.

Post a Comment

0 Comments