फेरीवाला धोरणाची त्वरित अंमल बजावणी करा अनधिकृत बांधकामे त्वरित तोडा...


■अनधिकृत बांधकामास जवाबदार असणा-या सर्वावर कारवाई करा.. ठाणे काँग्रेसचा मूक मोर्चा...


ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेने फेरीवाला धोरणाची त्वरित अंमलबजावणी करून अनधिकृत फेरीवाले हटविण्यासाठी पाउले उचलावीत व ठाण्यातील अनधिकृत बांधकामांना जवाबदार असणा-या सर्वावर कारवाई करावी अशी मागणी आज ठाणे शहर (जिल्हा)काॅग्रेसच्या वतीने करण्यात आली.            ठाणे महानगरपालिकेच्या माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या  सहा.आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे या घोडबंदर रोड येथील कासारवडवली येथील परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी गेल्या असतांना त्यांच्यावर चाकूने जीवघेणा हला केला. त्यांची या हल्ल्यात दोन बोटे तुटली असून त्यांचा सुरक्षा रक्षक ही गंभीररीत्या जखमी झाला आहे.एका महिलेवरील या भ्याड कृत्याच्या निषेधार्थ ठाणे काँग्रेस अध्यक्ष ऍड श्री.विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे काँग्रेस कार्यालय ते जिल्हाधिकारि कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला होता.          हा मोर्चा पोलिसानी हस्तक्षेप करित बाजारपेठेतच रोखला या प्रसंगी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी सागितले की,ठाणे महापालिकेने वेळीच फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी केली असती व अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मोहिम आखली असती तर अशा घटना घडल्या नसत्या आता अनधिकृत बांधकामाच्या बाबतीत आयुक्तांनी स्वतःच्या अधिकारात कारवाई केली पाहिजे.          सर्व अनधिकृत बांधकामे सिल करूण ताब्यात घेऊन या बांधकामाना जे जे जबाबदार असतील त्या सर्वावर कारवाई झाली पाहिजे असे सांगून कारवाई साठी गेलेल्या अधिका-याना पोलीस प्रोटेक्शन देताना कोण हस्तक्षेप करतो हे शोधून काढून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ठाणे महापालिकेने आतातरि दिखाऊ कारवाई न करता फेरीवाला,कामगार धोरणाची त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणी केली हा मूक मोर्चा पोलिसानी रोखल्यानंतर  जिल्हाधिकाऱ्यांना त्या संबंधीचे निवेदन देण्यात आले.

                       

Post a Comment

0 Comments