पीडीतेला व तिच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची रिपाईच्या वाहतूक आघाडीची मागणी
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्काराची घटना घडली असून या प्रकरणातील दोषी आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करण्याची आणि पिडीत मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वाहतूक आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.            याबाबत ठाणे जिल्हाध्यक्ष विलास गायकवाड, कार्याध्यक्ष अरविंद अंगारखे, संघटक अब्बास शेख यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी मानपाडा पोलीस स्टेशन येथे तपास अधिकारी सोनाली ढोले आणि पोलीस निरीक्षक पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.        मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत भोपर येथील अल्पवयीन मुलीवर गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून ३० हून अधिक नराधमांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन पिडीतेवर वारंवार बलात्कार केला.  साकीनाका येथील प्रकरण ताजे असतांनाच सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या डोंबिवलीत हि घटना घडली आहे.         पुरोगामी महाराष्ट्रात स्त्रियांना ५० टक्के समान न्याय देण्याच्या गोष्टी केल्या जातात, त्याच महाराष्ट्रात महिला असुरक्षित आहेत. त्यामुळे या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी. तसेच पिडीत मुलगी व तिच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी रिपाई वाहतूक आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments