वास्तू सल्लागाराच्या कार्यालयातून इंद्रजाल (काळा समुद्र शैवाल) आणि घोरपडीचे अवयव जप्त कल्याण मध्ये वनविभागाची धडक कारवाई
कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  दुर्मिळ होत असलेले काळे समुद्री शेवाळहाथजोडीघोरपडीचे अवयव यांच्या माध्यमातून व्यवसाय वुध्दीवशीकरणबरकत लाभते या अंधश्रद्धेपोटी अनेक जण या वस्तु जास्त भावाने खरेदी करीत कल्याण साधण्याचा प्रयत्न करतात. बंदी असलेल्या दुर्मिळ वस्तूची काळ्या बाजारात खरेदी होत असल्याने अनेक जण या वस्तूच्या शोधात असतात. असाच एक धाक्कादायक प्रकार एनजीओच्या मदतीने वनखात्याने धडक कारवाई करीत कल्याण मध्ये उजेडात आणला आहे.          


कल्याणमधील एका महिला वास्तू सल्लागाराच्या कार्यालयात वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्युरो आणि वन विभाग कल्याण शाखेने छापा  टाकत  इंद्रजाल (काळा समुद्री शैवाळ) २५० नग५० हाथ जोडीनगघोरपडीचे अवयव ८० नग जप्त केले आहे. याप्रकरणी वनविभागाकडून वास्तू सल्लागार महिला गीता जाखोटिया आणि तिचा  कार्यालयातील कर्मचारी नवनाथ घुगे आणि अक्षय देशमुख अशा तिघांना अटक केली आहे. या वस्तू इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यालयात का कुठुन आणल्या गेल्या याचा तपास सुरु असल्याचे वन विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.       कल्याण पश्चिमेकडील मॅक्सी ग्राउंडसमोरील इमारतीत असलेल्या गीता जखोटिया या  महिलेच्या वास्तू सल्लागाराच्या कार्यालयात दुर्मिळ व बाळगण्यास बंदी असलेली काळ्या समुद्र शैवाळाचे तुकडे व घोरपडीचे अवयव असल्याची माहिती वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्युरोला माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्युरो विभागीय उपसंचालक योगेश वारकडगजेंद्र हिरेआणि वन विभागाचे आर एन चन्ने यांचा पथकाने गुरुवारी सायंकाळी धाड टाकली असता या कार्यालयात २५० नग काळ्या समुद्र शैवाळाचे तुकडे आणि ८० नग घोरपडीचे अवयवहाथजोडी ५० नग आढळून आले.  या पथकाने मुद्देमालासह तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीसकोठडीत सुनावली आहे. या वस्तूचा साठा करण्यास किंवा या वस्तू जवळ बाळगण्यास कायद्याने बंदी असतानाही इतक्या मोठय प्रमाणावर या वस्तूचा साठा का करण्यात आला होता याची चौकशी सुरु असल्याचे वनविभागाचे अधिकारी चन्ने यांनी सांगितले. दरम्यान इंद्रजाल आणि घोरपडीचे अवयव घरातकार्यालयातदुकानात ठेवल्यास सुखशांती आरोग्य आणि लक्ष्मी घरात नांदतेया अंधश्रद्धेपोटी या वस्तू बाळगल्या जात असून काळी जादू करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. तर  आयुर्वेदिक औषधा मध्ये देखील या वस्तू वापरल्या जातात मात्र या वस्तू जवळ बाळगण्यास किंवा त्यांची विक्री करण्यास वन्यजीव कायदा १९७२  अन्वये मज्जाव करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments