अग्निशमक दलाच्या जवानांनी वाचवला गो मातेचा जीव

 
कल्याण  ( शंकर जाधव ) अग्निशमक दलाच्या जवानांनी माणुसकीचं दर्शन दाखवत चेंबर मध्ये पडलेल्या एका गायीचे खूप शर्तीच्या प्रयत्नाने जीव वाचवला. कल्याण पश्चिमेकडील सह्याद्री नगर परिसरात हि घटना घडली. रात्रभर ड्रेनेजच्या पाण्यात राहिल्यामुळे गाय थंडीने हुडहुडत होती. त्यामुळे  जवानांनी गरम पाण्याने  गाईला आंघोळ घातली.अग्निशमन दलाच्या विनायक लोखंडेप्रमोद कोलते,हेमंत असकर ,सुशिल कवटेराठोड आदींच्या टीमने ही कामगिरी केली.  
     सह्याद्री नगर परिसरात एक गाय चेंबरमध्ये अडकल्याची माहिती परिसरातील रहिवाशांनी मंगळवारी अग्निशमक दलाच्या जवानांना दिली. अग्निशमक दलाच्या जवानांनी  घटनास्थळी धाव घेतली. सोमवारपासून दशरथ तावरे यांच्या मालकीची  गाय हरवली होती.  चेंबरमध्ये अडकलेल्या गाईला बाहेर काढण्यात अथक मेहनत घेत बाहेर काढले.

        रात्रभर चेंबर मध्ये असल्याने तिला बाहेर येण्यास त्रास होत होताअशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली. चिखलात माखल्यामुळे तसेच रात्रभर पाण्यात राहून थंडीमुळे गाईला  हुडहुडी भरलेली.तिला बरं वाटावं म्हणून  जवानांनी गरम पाण्यांन आंघोळ  देखील घातली. हा सर्व प्रकार दशरथ  तावरे  यांना माहीत पडल्यावर त्यांनी अग्निशमक दलाच्या जवानांचे आभार मानले. 

Post a Comment

0 Comments