कल्याण पूर्वेत सेवा सप्ताहाला सुरवात भाजपा कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे यांचे आयोजन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे यांच्या वतीने १७ सप्टेंबर नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते २५ सप्टेंबर पंडित दिन दयाल उपाध्याय यांच्या जयंती पर्यंत सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी या सेवा सप्ताहाला सुरवात करण्यात आली.  भाजपा कल्याण पूर्व मंडल आणि स्वराज्य प्रतिष्ठान या कार्यालयात या सेवा सप्ताहाला सुरवात झाली आहे. यावेळी परिसरातील दिव्यांग नागरिकांचा सन्मान करण्यात आला आणि पंतप्रधान मोदी यांनी ज्या योजना सुरु केल्या आहेत, त्या योजनांचा ज्यांनी लाभ घेतला त्यांना लाभार्थी प्रमाणपत्र देखील देण्यात आले. नरेंद्र मोदी यांनी आपल्या सुरवातीच्या काळात चहा विकल्याने;  मोदी चहावाला ते पंतप्रधान झाल्याने त्यामिनित्त परिसरातील नागरिकांना आणि दिव्यांगाना चहा वाटप करून सप्ताहाची सुरवात करण्यात आली.       यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, पांडुरंग भोसले, मंडल अध्यक्ष संजय मोरे, माजी परिवहन समिती सभापती सुभाष म्हस्के, मंडल सरचिटणीस अरुण दिघे, युवा मोर्चा सरचिटणीस विवेक त्रिवेदी, महिला मोर्चा सरचिटणीस निशा सिंह, अल्पसंख्याक अध्यक्ष गुड्डू खान, अंजू शुक्ला, दिपाली कचरे, सारिका जाधव, दिपक गायकवाड, अर्चना जाधव आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments