विनोद शेलकर यांना राज्यस्तरीय आर्ट बिट्स महाराष्ट्र गुरु गौरव पुरस्कार
कल्याण ,  कुणाल  म्हात्रे  : गुरुनानक इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज कल्याण येथील कलाशिक्षक विनोद लक्ष्मण शेलकर यांना राज्यस्तरीय आर्ट बिट्स महाराष्ट्र गुरु गौरव  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.          आर्ट बिट्स फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने "आर्ट बिट्स महाराष्ट्र गुरु गौरव  पुरस्कार २०२१" पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून शिक्षकांची या पुरस्कारासाठी माहिती मागविण्यात आली होती. कलासामाजिक क्षेत्रामध्ये नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 

Post a Comment

0 Comments