संतोष तरे यांच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : माजी नगरसेवक तथा उद्योगपती संतोष तेरे यांच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते. गेल्या दोन वर्षांत कोरोना अभावी नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात नोकऱ्या गेल्याशहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात बेरोजगार झाले.           आणखी शहरातील बेरोजगारी वाढू नये यासाठी संतोष तरे  यांच्या प्रयत्नाने फ्लिपकार्ड कंपनी मध्ये बेरोजगारांना रोजगार उलब्ध करून देण्यात आला. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्याहस्ते या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी टिटवाळा मधील शेकडो नागरिकांनी या संधीचा लाभ घेतला.            यावेळी बेरोजगारांना विविध सुविधांसह रोजगार उपलब्ध झाल्यामुळे  नागरिकांनी संतोष तरे यांचे आभार मानले. तसेच नागरिकांच्या हितासाठी आम्ही असे स्तुत्य उपक्रम पुढेही राबविणार असल्याचे प्रतिपादन तरे यांनी केले. यावेळी विष्णू वाघेसय्यद मुस्तफाअरुण जाधव,साईनाथ तरेस्वप्निल सूर्यवंशीअमित तरेआनंद वाघमारेबंटी ढोणेनंदलाल पगारेमहेंद्र शेजुळ,गणेश निगम,राहुल दुंदे आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments