दिव्यातील अपयश झाकण्यासाठी डम्पिंग १४ गावांमधील मौजे भंडार्ली येथे आणले – राजू पाटील कचराप्रश्नी मनसे आक्रमक
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कचऱ्याचे हे आंदोनल आहे आणि आंदोलन आक्रमक होईल. भंडार्ली गावात डम्पिंग आणले तर अधिकारी आणि नेत्यांना कचऱ्यात टाकू. आता सहनशक्तीचा अंत झाला आहे. वारंवार केसेसची धमकी दखवुन डम्पिंग लादत असाल तर होऊन जाऊ दे केसेस असा सज्जड दमच मनसे आमदार राजू पाटील यांनी अधिकारी आणि स्थानिक नेत्यांना दिला आहे.ठाणे महापालिकेतील कचरा १४ गावांमधील मौजे भंडार्ली येथे टाकण्यासाठी चार हेक्टर जागा ठाणे महानगरपालिकेने भाडे तत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाला भंडार्ली ग्रामस्थांसह १४ गाव सर्व पक्षीय विकास समितीने विरोध केला आहे. आधीच १४ गावांमध्ये प्रदुषणाची समस्या असतांना ठाणे महानगरपालिकेचा कचरा जबरदस्तीने या गावांच्या माथी मारत असल्याने सर्व गावांतील ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत १४ गावातील ग्रामस्थांची बैठक पार पडली या बैठकीला मनसे आमदार राजू पाटील पण उपस्थित होते.त्यावेळी आक्रमक भूमिका घेत सांगितले की दिव्यातील अपयश झाकण्यासाठी डम्पिंग १४ गावांमधील मौजे भंडार्ली येथे आणले आहे. निवडणूक डोळ्या समोर ठेवून प्रकार चालू असून यात राजकारण केले जात आहे आणि जर १४ गावात डम्पिंग आणलेच आंदोलन केले जाईल. कचऱ्याचे हे आंदोनल आहे आणि आंदोलन आक्रमक होईल. भंडार्ली गावात डम्पिंग आणले तर अधिकारी आणि नेत्यांना कचऱ्यात टाकू. आता सहनशक्तीचा अंत झाला आहे. वारंवार केसेसची धमकी दखवुन डम्पिंग लादत असाल तर होऊ जाऊ दे केसेसअसा सज्जड दमच मनसे आमदार राजू पाटील यांनी अधिकारी आणि स्थानिक नेत्यांना दिला आहे. 

Post a Comment

0 Comments