महिलांवरील अत्याचारा संदर्भात भाजप शिष्ट मंडळाने घेतली पोलिस उपायुक्तांची भेट
डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेवर भाजपने शहरातील महिला सुरक्षित राहण्यासाठी पोलिसांनी पाउले उचलावीत अशी मागणी करत कल्याण परिमंडळ-३ चे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेऊन निवेदन दिले.

 भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी, डोंबिवली पूर्व शहर सचिव राजू शेख, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मिहीर देसाई, कल्याण पश्चिम शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी मंगळवारी कल्याण परिमंडळ-३ चे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेतली.
     यावेळी भाजपच्या शिष्टमंडळाने निवेदन देत महिला सुरक्षिततेसाठी पोलिसांनी पाऊले उचलावीत असे विनंती केली.यावेळी जिल्हाध्यक्ष कांबळे म्हणाले,       कल्याण-डोंबिवली एक सांस्कृतिक नगरी आहेया नगरीला काळिमा फासणाऱ्या काही गोष्टी इथे घडलेल्या आहेत.याबाबत महाराष्ट्राचे विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर  महाराष्ट्र प्रदेश नेत्या चित्रा वाघ यांनी पोलीस स्टेशनला भेट दिली होती. 
        दक्षता समिती त्वरित गठीत करावी, महिलांच्या अन्याय अत्याचारा विरुद्ध ठोस उपाययोजना कराव्यात, विविध ठीकाणी सामाजिक उपक्रम राबवावेत, त्यामध्ये समाजातील तरुण वर्ग किंवा सर्वांना मार्गदर्शन करूनमार्गदर्शक तत्वे ठरवावी जेणेकरून समाजातील घटना या थांबले जातील असे सांगितले.तर कल्याणातील घटनेत भाजपचा कार्यकर्ता नाही, भाजपला बदनाम करू नये असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments