जातीय तेढ निर्माण करणाऱ्या केतकी चितळेला त्वरित अटक करण्याची रिपब्लिकन पक्षाची मागणी.

नवी मुंबई, प्रतिनिधी  ;  मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने गेल्यावर्षी फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर वादग्रस्त पोस्ट केली होती. नवबौद्ध सहा डिसेंबरला फुकट मुंबई दर्शन ला येतात अशी तिची पोस्ट होती तिच्या या पोस्ट मुळे तमाम आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या होत्या. रबाळे पोलीस स्टेशनला तिच्यावर अनु. जाती व जमाती प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.          ठाणे स्पेशल कोर्टाने तिचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला असून पोलिस प्रशासनाने तिला त्वरित अटक करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने सहायक पोलिस आयुक्त विनायक वस्त यांच्या कडे केली आहे. सदर शिष्टमंडळात रिपब्लिकन पक्षाचे नवी मुंबई सरचिटणीस एल. आर. गायकवाड, युवक आघाडीचे अध्यक्ष विजय कांबळे, आयटी सेलचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सचिन कटारे, रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनचे लक्ष्मण गोडसे, सुरेश मोहडे, भीमराव कामिठे, प्रकाश जावळे,  आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments