कल्याण पूर्वेतील करदात्या आणि मतदात्या नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याची मागणी


■कल्याण विकासिनीचे ऍड.उदय रसाळ यांची पालिका आयुक्तांना पत्र..


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पूर्व मधील करदाते आणि मतदात्या लोकांना आरोग्य सेवेपासून वंचित ठेवू नये अशी मागणी कल्याण विकासिनीचे ऍड.उदय रसाळ यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.कोरोना रुग्ण संख्या कल्याण डोंबिवलीत वाढतच आहे. कल्याण पूर्वेतील सर्वच हॉस्पिटल, क्लिनिक मधे पेशंटची गर्दी दिसत आहे. त्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक महानगरपालिका तिसऱ्या लाटेची तयारी जोमाने करत आहेत. परंतु क.डो.म.पा. आरोग्य सेवेबाबत अजून कोमात आहे. आधीच्या दोन्ही लाटेत कल्याण पूर्व वाऱ्यावर होते. तिसऱ्या लाटेत सुध्दा असेच वाऱ्यावर सोडले जाण्याची शक्यता आहे. कल्याण पूर्वेतील कोविड सेंटरवर लाखो रुपये खर्च करण्यात आलेत. परंतु एकही पाहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सुरू झाले नाहीत.त्यामुळे कल्याण पूर्व मात्र तिसऱ्या लाटेत जशी पहिल्या व दुसऱ्या लाटेत भरडले गेले तसेच तिसऱ्या लाटेत भरडल्यास आश्चर्य वाटणार नाही. तिसऱ्या लाटेत लहान मुले जास्त प्रभावित होतील असे भाकीत वर्तविले जात आहे. मात्र पालिका प्रशासन कल्याण पूर्व मधील करदात्या नागरीकांच्या मुलाबाळांसाठी काही उपाययोजना का करत नाही असा सवाल उदय रसाळ यांनी उपस्थित केला आहे.कल्याण पूर्वेतील लसीकरण केंद्र सातत्याने बंद असतात त्याबद्दल ही वारंवार विचारणा करून बदल होत नाही. कल्याण डोंबिवलीत असणाऱ्या लसीकरण केंदा पैकी कल्याण पूर्वेला  उपेक्षित ठेवलं जात आलाय. शेकडा प्रमाण सांगायचे तर डोंबिवलीत 50% पेक्षा जास्त केंद्र असतात ३५ % पेक्षा जास्त कल्याण पश्चिम मध्ये आणि अंदाजे ४ लाखाच्या लोकसंख्या असणाऱ्या कल्याण पूर्वे मधे मात्र १० % लसीकरण केंद्र आहेत.  त्यामुळे लसीकरण न झालेले लोकसंख्या कल्याण पूर्वेत प्रचंड आहे.त्यामुळे तिसरी लाट आलीच तर कल्याण पूर्वेतील नागरिक पहिल्या लाटेत जसे भरडले गेले तसेच भरडले जातीलजिवानिशी जातील याची नोंद पालिका प्रशासन आणि लोक प्रतिनिधीनी घेतली पाहिजे. यासाठी कल्याण पूर्वेतील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्याची मागणी कल्याण विकासिनीचे ऍड.उदय रसाळ यांनी केली आहे. 


Post a Comment

0 Comments